म वि प्र कृषी महाविद्यालयात शाश्वत शेती दिनाचे व पालक संवाद सत्राचे आयोजन
महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाची सिताराम पाटील कृषी महाविद्यालय चाचडगाव नाशिक येथे “शाश्वत शेती दिना” च्या औचित्याने महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय हे नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये शेती क्षेत्रातील बदलत्या आव्हाना बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असते. याच अनुषंगाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांच्या संकल्पनेतून शाश्वत शेती दिन आणि त्याच सोबतच पालक विद्यार्थ्यांसाठी विशेष संवाद सत्राचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म. वी. प्र. शिक्षण अधिकारी डॉ. अजित मोरे होते त्यासोबतच स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य मा. श्री सनी वाणी व इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.







