दि. १ मे २०२६ रोजी मराठा विद्या प्रसारक समाज संचालित आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ संलग्न कर्मयोगी सीताराम पाटील कृषि महाविद्यालयामध्ये “महाराष्ट्र दिन “ उत्साहाने साजरा करण्यात आला. “दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ” अशी संबंध भारत देशात ओळख असणाऱ्या ह्या महान राज्याच्या स्थापनेच्या पावन स्मरणार्थ हा दिन साजरा केला जातो. आज ह्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य श्री. तुकाराम बोराडे , मा श्री. विठ्ठलराव आपसुंदे, मा श्री नाना मोरे आणि कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे आणि कृषि तंत्र निकेतन प्राचार्य डॉ. विशाखा बागुल याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने परिसर भारावून गेला .सदर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थिताना सम्बोधीत करताना श्री. तुकाराम बोराडे यांनी महाराष्ट्रच्या स्थापनेपासून आज पर्यंत केलेल्या गौरवशाली प्रगतीवर प्रकाश झोत टाकला. तर प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांनी महाराष्ट्र स्थापनेसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले, यांचे स्मरण करत त्यांना मानवंदना देत विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या भावी प्रगतीत हातभार लावण्याचे आवाहन केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विध्यार्थी उपस्थित होते.
महाराष्ट्र दिन – २०२६










