*पर्यावरण जीवनातील महत्त्वाचा भाग*
महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक व मुक्त कृषी शिक्षण केंद्र क. दु. सी.पाटील कृषी महाविद्यालय नाशिक व राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत दिनांक 5 जून 2024 रोजी जागतिक पर्यावरण दिवस महाविद्यालयात साजरा करण्यात आला. प्रास्ताविकामध्ये रासेयो कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक एस. यु. सुर्यवंशी यांनी पृथ्वी ही आपली माता आहे तिची काळजी घेणे ही तुमची जबाबदारी आहे असे सांगत पर्यावरण दिवसाची सुरुवात 1972 पासून संयुक्त राष्ट्राने केली व दरवर्षीच्या वेगवेगळ्या थीमनुसार यावर्षी आमची जमीन (Our soil) अशी देण्यात आली आहे असे सांगितले.
विद्यार्थी मनोगतांमध्ये कुमार ईश्वर आव्हाड व कुमारी सायली गाडेकर सोबतच प्रा. आर डी. दरेकर यांनी आपल्या मनोगतांमध्ये जमिनीची सुपीकता सध्या 29 टक्के कमी झाली असून झाडे लावा झाडे जगवा यापेक्षा झाडे लावा पृथ्वी जगवा असा उल्लेख करावा लागेल असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख वक्ते महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ. बापूसाहेब द भाकरे यांनी जागतिक जल दिनाप्रमाणेच पर्यावरण हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे असे सांगितले. वाढती लोकसंख्या त्यासाठी लागणारे अन्नधान्याची गरज व कमी होत चाललेली जमीन ह्या सर्वांचा मेळ घालावा लागणार आहे. हरित क्रांती नंतर होणाऱ्या रासायनिक खतांचा व पाण्याचा गैरवापर यामुळे आपली जमीन नापीक होत चाललेली आहे असे प्रतिपादन केले. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व त्याच्या लगतचे अनेक जिल्ह्यातील जमिनी नापीक होत चाललेली आहे. वाढते शहरीकरण, जंगल तोड इत्यादी एक ना अनेक कारणांमुळे तापमान वाढत चालले आहे. जर आज आपण सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण केले नाही तर जसे कोरोना काळात ऑक्सिजन विकत घेतले तसे भविष्यांमध्ये रोजच्यासाठी ऑक्सीजन विकत घ्यावे लागेल असे प्रतिपादन त्यांनी केले. राष्ट्रीय सेवा अंतर्गत शासनाकडून करावयाचे उपक्रम त्यात पाणी संवर्धनासाठी चर खोदणे,तलाव विहिरी स्वच्छ करणे, छोटे डॅम बांधणे, प्राप्त पाण्याचा जपून वापर करण्यासाठी व पाणी वाचवण्याच्या सवयीसाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, पथनाट्य, प्रबोधन कार्यक्रम व गृहभेटी. या प्रमाणे उपाययोजना करावयास सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी श्रावणी पगार व श्रुति घोरपडे या विद्यार्थिनींनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमारी गायत्री बनकर या विद्यार्थिनीने केले सदर कार्यक्रमासाठी स्वयंसेवक विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारीवृंद मोठ्यासंखेने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. के.आर.भोईर, प्रा. पी. बी. चौहान, प्रा. एस. बी. सातपुते यांचे सहकार्य लाभले.
Celebration of World Environment Day