मविप्र कृषी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयामध्ये २००३ ते आतापर्यंत उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. महाविद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा देत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मविप्र संस्थेचे उपसभापती देवरामजी मोगल, डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता तथा संचालक (शिक्षण ) डॉ.प्रशांत बोडके, ग्रेप मास्टर चे कार्यकारी संचालक श्री.सुनील शिंदे, कृषिदूत बायोहर्बल चे कार्यकारी संचालक डॉ. रामनाथ जगताप, श्री.कैलास बोरावके, श्री. साहेबराव पाचपुते, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य श्री.रमेश चिखले, श्रीमती. सुखदा गायके आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष देवरामजी मोगल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेमधील माजी विद्यार्थी संघटनेविषयी माहिती दिली. यानंतर डॉ. रामनाथ जगताप यांनी कृषी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना व विद्यार्थ्यास नवीन इनोवेशन करून पेटंट घेण्याविषयी मार्गदर्शन केले. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांनी माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना करून त्यामार्फत गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा संकल्प आहे असे भाष्य केले. मेळाव्यात सहभागी झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयबद्दल मनोगत मांडले.