मविप्र कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिकचे विद्यार्थी कल्याण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या मार्फत दिनांक 26 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन महाविद्यालयात साजरा करण्यात आला. प्रास्ताविकामध्ये प्रा. एस. यू. सुर्यवंशी यांनी आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन या दिवसाचे महत्व आणि गरज याविषयी माहिती दिली.
सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. पंकजसिंह बी. चौहाण यांनी आपल्या मनोगतामध्ये अमली पदार्थाचे व्यसन हा एक असा आजार आहे की जो तरुण पिढीवर सतत परिणाम करत असतो त्यांना शारीरिक, मानसीक व सामाजिक या तिन्ही प्रकारे आजारी बनवत आहे त्यासाठी महाविद्यालयीन तरुणांनी स्वतः, आपले वर्गमित्र, व महाविद्यालयातील इतर विद्यार्थी यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे सोबतच अमली पदार्थ तस्करी किंवा इतर ठिकाणी कोठेही त्याची विक्री अथवा वापर दिसल्यास योग्य ठिकाणी तक्रार दाखल करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. बापूसाहेब द. भाकरे यांनी लोकांनी अमली पदार्थाच्या दुष्परिणामाबद्दल जागरूक करण्यासाठी तरुण मंडळी लहान मुलांमध्ये अमली पदार्थाचे व्यसन रोखणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे तसेच ड्रग तस्करी रोखण्यासाठी ही या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आज जगभरात अमली पदार्थाच्या व्यसनाविरुद्ध जनजागृती होत आहे त्यातून लोकांना होणाऱ्या हानींची जाणीव करून देण्याच्या प्रयत्न सर्वत्र चालू आहेत या संदर्भात माहिती दिली. नंतर सामूहिक प्रतिज्ञा वाचन केले.
सदर कार्यक्रमासाठी स्वयंसेवक विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारीवृंद मोठ्यासंखेने उपस्थित होते. अमली पदार्थ सेवन विरोधी प्रतिज्ञा विद्यार्थ्यांकडून व उपस्थितांकडून प्रा. पंकजसिंह चौहाण यांनी करून घेतली तसेच कार्यक्रमाचे आभार प्रा. एस यु सूर्यवंशी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. डी. आर निकम व प्रा. श्वेता शेवाळे यांचे सहकार्य लाभले.