यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र, नाशिक व मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषि महाविद्यालय चाचडगाव येथील आवारात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मविप्र संस्थेचे सरचिटणीस तसेच अध्यक्ष यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र, नाशिक चे मा. ऍड. नितीनजी ठाकरे , उपाध्यक्ष मा. विश्वास मोरे , उपसभापती मा. देवराम मोगल, वृक्षारोपण करण्यासाठीं रोपे देवुन सहकार्य करणारे जी प्लांट एनर्जीचे संचालक मा. श्री. गोकुळ पाटील, यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र चे सचिव मा.डॉ. अशोक पिंगळे, सदस्य एड. मा.राजेंद्र ढोकळे, लेखिका मा.सुरेखा बोराडे, मा. डॉ. अशोक बोराडे, म. वि. प्र. संस्थेचे संचालक मा. प्रवीणनाना जाधव, संचालक मा. विजय पगार, संचालक मा. शिवाजी गडाख, संचालक मा. रमेशचंद्र बच्छाव, संचालक मा.रमेश पिंगळे, सेवक संचालक मा. सी डी शिंदे, म.वि.प्र. संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे सर यांनी केल. प्रास्ताविकामध्ये डॉ. भाकरे यांनी एक पेड मा के नाम या अभियाना अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचा हेतू मांडला. तर सरचिटणीस ऍड. ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वातावरणात सातत्याने बदल होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपनाचे महत्व विशद केले. कार्यक्रमास यशवंतराव सेंटरचे श्री गणेश ढगे, कृषि महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. यु. सूर्यवंशी तर आभार डॉ. डी. आर. निकम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. विशाल गमे, प्रा.चेतन देसले, प्रा.योगेश भगुरे, प्रा. मयूर गाडेकर यांनी परिश्रम घेतले.
मविप्र कृषी महाविद्यालय चाचडगाव येथे वृक्षारोपण