मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयातील पाचव्या सत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची कृषि व्यवसाय व्यवस्थापन ह्या विषयाअंतर्गत शुक्रवार दि.२६ जुलै २०२४ रोजी सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. मोहाडी, ता-दिंडोरी येथे भेट आयोजित केली होती.
या भेटीत विद्यार्थ्यांनी फार्मर्स मॉलला भेट देऊन तेथील यंत्रणा समजावून घेतली. तसेच विद्यार्थ्यांनी प्रोसेसिंग प्लॅन्ट ला भेट देऊन टोमॅटो प्युरी तयार करण्याची पद्धत आणि त्याचे पॅकिंग, क्वालिटी स्टँडर्ड इत्यादींची माहिती घेतली.
त्याचप्रमाणे पाणी फाऊंडेशन ने कंपनीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक मा.श्री. विलासजी शिंदे यांच्या जीवन प्रवासावर व सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना, प्रगती कशी झाली यावर माहितीस्तव दृक्श्राव्य फीत तयार केली असून त्यातून विदयार्थ्यांनी कंपनीचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घेतला..
या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोणताही कृषि व्यवसाय सुरू करत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर चिकाटीने केलेली मात याचे सखोल ज्ञान मिळाले..
या अभ्यास भेटीत 32 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.