म.वि प्र. कृषी महाविद्यालयात “समाजदिन साजरा“
मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयामध्ये दि.१९ ऑगस्ट २०२४ रोजी कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिन “समाजदिन” म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य श्री.तुकाराम बोराडे, श्री.अशोक पगार कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बापूसाहेब दि.भाकरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे आद्य संस्थापक आणि स्फूर्तिस्थान असणाऱ्या सर्व कर्मवीरांना या प्रसंगी भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच प्राध्यापक यांनी म. वि प्र संस्थेचा इतिहास तसेच संस्थापकांनी हि संस्था उभी करण्यासाठी दिलेल्या अनमोल योगदानाचे कार्य सर्वांसमोर मांडले.
आलेल्या पाहुण्यांनी अतिशय सुंदर शब्दात संस्थेबद्दल माहिती सांगितली. तसेच बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद अंगीकारून आणि बहुजन सेवा हीच ईश्वर सेवा असे मानून या समाजसेवकांनी हि संस्था कश्या प्रकारे उभी केली हे सर्वांना थोडक्यात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा.श्री.पी.बी.चव्हाण यांनी केले.