Landline: (0253)2577536 Mobile: +91-9403929617 acn_13@rediffmail.com
mvps mcaer_logo

Maratha Vidya Prasark Samaj's

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture

A/P - Chachadgaon (Nashik - Peth Highway), Tal - Dindori, Nashik-422203

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri )

mpkv mcaer_a

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)

शैक्ष. वर्ष 2024-25 मध्ये विद्यापीठ नियमानुसार विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली.

सदर विद्यार्थी परिषदेवर शैक्षणिक गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड होत असते. त्या अनुषंगाने महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेवर तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु. देशमुख साक्षी ज्ञानेश्वर हिची चेअरमन म्हणून निवड झाली. तसेच जनरल सेक्रेटरी (GS) म्हणून पाचपेंड केशव रमेश ह्याची निवड झाली. सदर परिषदेचे अध्यक्ष हे महाविद्यालयाचे प्राचार्य असतात. विद्यापीठ नियमानुसार परिषदेवर पाच समित्या गठित करण्यात आल्या. ह्या समित्यांवर गुणवत्तेनुसारच विद्यार्थी निवड करण्यात आली. प्रत्येक समितीवर संयोजक आणि सदस्य म्हणून निवड झालेले विद्यार्थी तसेच सल्लागार म्हणून महाविद्यालयातील प्राध्यापक यांची नेमणूक करण्यात आली.

ह्या विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण सोहळा दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी पार पडला. पदग्रहण सोहळ्याचे प्रस्ताविक हे महाविद्यालय विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. संगिता कडलग यांनी केले. या पदग्रहण सोहळ्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ. बापूसाहेब भाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांची काय जबाबदारी असते किंवा त्यांची कामे यासंदर्भात माननीय प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. आभार प्रदर्शन परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. विशाल गमे यांनी केले.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण समारंभ

🌿Join the Future of Farming – Admissions Open 2025-26 🌿

Scroll to top