मविप्र कृषि महाविद्यालयात जागतिक मृदा दिन साजरा
मोजणे, निरीक्षण करणे आणि व्यवस्थापन करणे ही मूल्ये माती सोबतच दैनंदिन जीवनात देखील महत्त्वाची.
मविप्र च्या कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील, कृषि महाविद्यालयात ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. या वर्षी “मातीची काळजी :- मोजणे, निरीक्षण, व्यवस्थापन करणे” ही थीम स्वीकारण्यात आली होती. या कार्यक्रमाप्रसंगी शेवटच्या वर्षाच्या शिवम पवार, साक्षी कासार, तनुजा जाधव, आराध्य कावळे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र च्या आयएमआरटी चे संचालक तथा प्राचार्य डॉ. प्रशांत सुर्यवंशी उपस्थित होते. त्यांनी माती सोबतच आपल्या दैनंदिन जीवनात विद्यार्थ्यानी मोजणे, निरीक्षण आणि व्यवस्थापन ही 3 मूल्ये अमलात कशी आणावी या बद्दल सखोल मार्गदर्शन केले. या वेळी बोलताना त्यांनी विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. तसेच अध्यक्षीय भाषणात कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापुसाहेब भाकरे यांनी विद्यार्थ्यांना माती आणि तिचे संवर्धन या विषयी मार्गदर्शन केले. जागतिक मृदा दिन साजरा करण्यामागची पाश्र्वभुमी व त्याची गरज या वर ते बोलले. या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शिक्षकवृंद देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हे प्रा. नयन गोसावी यांनी तर आभार प्रदर्शन हे डॉ. प्रतीक्षा पवार यांनी केले.