सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बिटको महाविद्यालयामध्ये आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा बिटको महाविद्यालय व फुले- आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आली होती. मराठा विद्या प्रसारक समाज नाशिकचे केडीएसपी कृषी महाविद्यालय (कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय) संघाने राज्यस्तरीय करंडक मिळवला. स्पर्धेचे हे २७ वे वर्ष होते. मुंबई येथील प्रसिद्ध साहित्यिक योगिराज बागूल यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. संघातील विजेते स्पर्धक अथर्व केळकर, वैष्णवी देवरे यांचे मविप्र समाजाचे सरचिटणीस मा. एड. नितीनजी ठाकरे, सभापती मा.बाळासाहेब क्षीरसागर, इतर पदाधिकारी व संचालक मंडळ तसेच शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब द.भाकरे यांनी अभिनंदन केले.
कृषीच्या विद्यार्थ्यांनी पटकावला राज्य स्तरीय काव्य वाचन पुरस्कार …