कर्मयोगी दुलाजीसीताराम पाटील कृषी महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट प्रादेशिक गहू संशोधन केंद्र कुंदेवाडी निफाड आणि कांदा आणि द्राक्ष संशोधन केंद्र पिंपळगाव बसवंत येथे दि. ०७/०३/२०२५ रोजी आयोजित करण्यात आलेली होती. सदर भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना कुंदेवाडी येथे श्री. ए. एस. लोखंडे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक यांनी कुंदेवाडी येथे प्रक्षेत्रावर विद्यार्थ्यांना नेऊन सर्व गव्हाच्या नवीन जाती बद्दल माहिती दिली आणि सेमिनार घेऊन मार्गदर्शन केले. तसेच पिंपळगाव बसवंत येते डॉ. आर. बी. सोनवणे, सहयोगी प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग यांनी विद्यार्थ्यांना एग्रीकल्चरल स्टेशन बद्दल संपूर्ण माहिती दिली आणि प्रक्षेत्रावर भेट दिली. विद्यार्थ्यांना भेटीदरम्यान एग्रीकल्चर रिसर्च स्टेशन बद्दल संपूर्ण माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत सहाय्यक प्राध्यापक एस.एस. अहिरे, के. जे. पानसरे आणि प्रयोगशाळा सहाय्यक ए. एस. पवार, आर. एस. सोनवणे उपस्थित होते.

first Year Student’s Field Exposure Visit