” मविप्र च्या कृषि महाविद्यालयात कॅम्पस मुलाखती संपन्न “
मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयात मंगळवार दि.०८ जुलै २०२५ रोजी कॅम्पस मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. सदर मुलाखतींसाठी सह्याद्री फार्मस लि., नाशिक, ॲग्री–सर्च (इं) लि., नाशिक, कृषिदूत बायोहर्बल प्रा. लि., नाशिक, ओलिगो होरायझन प्रा. लि., नाशिक आणि प्लॅनेटआय फार्म–एआय लि., नाशिक या प्रथितयश कंपन्यांनी सहभाग घेतला. महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी देखील बहुसंख्येने उपस्थित राहून उदंड असा प्रतिसाद दिला व भविष्यात अशाच प्रकारे विविध चांगल्या कंपन्यांना सहभागी करून घेवून नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध करून द्याव्यात असे मत व्यक्त केले. मुलाखतीस आलेल्या सर्व कंपनी प्रतिनिधी यांनी सुद्धा मुलाखतीसाठी केलेल्या नियोजनाचे कौतुक केले तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कृषि संबंधित असलेल्या ज्ञानाबद्दल समाधान व्यक्त केले. सोबतच, भविष्यात असेच सहकार्य करण्याबाबत ग्वाही देखील दिली.
सदर कॅम्पस मुलाखतीस उपस्थित विद्यार्थी व कंपनी प्रतिनिधी यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांनी कॅम्पस मुलाखती आयोजना मागील भूमिका स्पष्ट करून सांगितली तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना कृषीक्षेत्रात कार्यरत खाजगी कंपन्यांमध्ये नोकरीच्या असलेल्या विविध संधींबद्दल अवगत केले. सदर मुलाखतींचे आयोजन करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मुलाखतींच्या यशस्वीतेसाठी, महाविद्यालयाच्या प्लेसमेंट कक्षातील प्राध्यापकांनी व सेवकांनी विशेष परिश्रम घेतले.