प्रथम वर्ष शिवार फेरी
मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, चाचडगाव, नाशिक येथील प्रा. योगेश भगुरे व प्रा. डॉ. कुणाल सुर्यवंशी, प्रा. कविता पानसरे, प्रा. श्वेता सातपुते, प्रयोगशाळा सहाय्यक भरत मोरे यांनी दिनांक 25/9/2025 रोजी उमराळे व आजूबाजूच्या परिसरात शिवार फेरी केली. शिवार फेरी करीत असताना श्री. निलेश केदार यांच्या प्रक्षेत्रावर भेट दिली. श्री. निलेश केदार हे उमराळे गावातील प्रगतीशील शेतकरी असून त्यांच्या शेतात उत्तम प्रतीचे विविध भाजीपाला पिके असून त्यांनी या पिकाविषयी सर्व माहिती सांगितली व उपस्थित प्राध्यापकांनी शेतकऱ्यांना विविध विषय म्हणजेच जमिनीचे आरोग्य, किड व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन, खतांचे नियोजन व विक्री व्यवस्था या बाबत चर्चा करून मार्गदर्शन केले. त्यांच्या शेतात सध्या टोमॅटो, फुलकोबी, कोबी, शिमला मिरची, भुईमूग, झेंडू इ पिके आहेत.