मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 20/ 9/ 2024 रोजी दीक्षारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस साहेब माननीय श्री.ॲड.डॉक्टर नितीनजी ठाकरे यांनी भूषविले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती ,म वि प्र समाज, माननीय श्री.डी.बी. आण्णा मोगल , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि प्राचार्य ,RAMETI, नाशिक
माननीय श्री.शिवाजीराव आमले, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर गुन्हे विभाग ,पंचवटी,नाशिक,माननीय श्री. .प्रतीक पाटील सर आणि शिक्षण अधिकारी माननीय श्री.अजित मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय प्राचार्य डॉ.बी डी भाकरे यांनी केले. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण क्षेत्रातील विविध रोजगार संधीबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी प्रथम वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाचे सेवक आणि सेवक इतर कर्मचारीही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्राध्यापिका कविता पानसरे यांनी केले.