मविप्र संचलित कृषी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम संस्कार शिबिर उत्साहात संपन्न
नाशिक: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्र अंतर्गत मविप्र समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय, नाशिक संचालित राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष संस्कार शिबिर उमराळे, ता. दिंडोरी येथे 11 ते 17 फेब्रुवारी 2025 या कालावधीत उत्साहात संपन्न झाले.
या शिबिरात माती परीक्षणाचे महत्त्व, मधमाशी पालनाचे महत्त्व, भाजीपाल्यातील कीड नियंत्रण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,आरोग्य तपासणी , एड्स जनजागृती आणि रक्तक्षय जनजागृती यांसारख्या विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ग्रामस्वच्छता अभियान , महिला जनजागृती विषयक प्रश्न, नवीन मतदार जनजागृती व नोंदणी यासारखे समाजोपयोगी उपक्रमही राबविण्यात आले.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मा. श्री. देवरामजी मोगल (उपसभापती, मविप्र समाज, नाशिक), मा. डॉ. अजित मोरे (शिक्षण आधिकारी, मविप्र समाज), श्री. वसंत भोये (सरपंच), डॉ. बी. डी. भाकरे (प्राचार्य,कृषी महाविद्यालय) श्री. पी. एम. कांबळे, श्री. एस. के. पाटील आणि श्री. संजय सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या समारोपप्रसंगी स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी संपूर्ण आठवड्यात केलेल्या उपक्रमांचा व्हिडिओ सादरीकरण केले. कृषि महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. बी. डी. भाकरे यांनी प्रस्ताविक सादर केले त्यात विद्यार्थ्यांनी केलेल्या उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रम प्रसंगी मा. ॲड. लक्ष्मण लांडगे (संचालक, मविप्र समाज नाशिक) यांनी संस्कार, राष्ट्रसेवा आणि युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. त्यांनी असे उपक्रम समाज परिवर्तनासाठी आवश्यक असल्याचे नमूद केले.
तसेच मा. श्री. रमेश पिंगळे (संचालक, मविप्र समाज नाशिक) यांनी विद्यार्थ्यांना समाजहिताचा विचार करण्याची आवश्यकता व्यक्त केली. शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे नेतृत्वगुण विकसित होतात तसेच गावातील शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांची गरज व समस्या जाणून घेण्याची संधी मिळते, असेही त्यांनी सांगितले.
या विशेष संस्कार शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. एस. यु. सूर्यवंशी, प्रा. के. आर भोईर,प्रा. एस. बी. सातपुते प्रा. पी. एन. पाटील, श्री निलेश हिरे, श्री किशोर पगार व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनच्या समाजोपयोगी उपक्रम व सक्रिय सहभागामुळे हे शिबिर यशस्वी पूर्ण झाले.