कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षाच्या (EDNT242) ह्या विषयाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल दि 16/08/2025 ते दि 24/08/2025 आयोजित करण्यात आली होती. या सहलीस एकून 77 विद्यार्थी व 5 स्टाफ उपस्थित होते.
या सहलीदरम्यान कोईमतूर ते बेंगलोर या शैक्षणिक व धार्मिक ठिकाणी भेटी दिल्या. त्या मधे १. कोइंबतूर २.ऊटी ३.म्हैसुर आणि ४.बेंगलोर आशा वेगवेगळ्या ठिकाणी भेट देण्यात आल्या.
ICAR चे sugarcane breeding institute कोइंबतूर येथे दि. 18/08/2025 रोजी आयोजित करण्यात आलेली होती. सदर भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना ICAR Sugarcane breeding institute येथे नवनवीन ऊसाच्या जाती बद्दल माहिती दिली आणि सेमिनार घेऊन मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना भेटीदरम्यान एग्रीकल्चर रिसर्च स्टेशन बद्दल संपूर्ण माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.त्या नंतर दि. 19/08/2025 रोजी ऊटी येथील Soil and Water conservation, botanical garden, tea factory and tea museum इत्यादी बद्दल संपूर्ण माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. व (Central food technology research institute, mysore) सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी रीसर्च इन्स्टिट्यूट म्हेसुर येथे दि 21/08/2025 रोजी आयोजित करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे म्हैसूर पॅलेस, वृंदावन गार्डन, म्हैसूर झु या ठीकाणी भेट दिली. दि. 22/8/2025 रोजी बंगलोर येथील Indian Institute of Horticulture research, National bureau of soil survey and land use planning , University of agriculture sciences Bengaluru या ठिकाणी भेट दिली. सदर भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना इंडीयन इन्स्टिट्यूट horticulutrue या ठिकाणी सेमिनार घेऊन विद्यार्थ्यांना फळें, फ़ुले, भाजीपाला यांच्या नविन विकसित केलेल्या वाणाची माहिती दिली त्याचप्रमाणे प्रक्षेत्रावर जाऊन विद्यार्थ्यांना माहीती सांगितली. NBSS LUP या ठिकाणी सेमिनार घेऊन मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना भेटीदरम्यान रिसर्च स्टेशन बद्दल संपूर्ण माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत 3 सहाय्यक प्राध्यापक- प्रा. यु. बी. पलघडमल , डॉ. के. के. सुरवंशी, प्रा. वाय. यल .भगूरे व प्रयोगशाळा सहाय्यक श्री.भरत मोरे व श्रीमती.सारिखा कापडणीस उपस्थित होते.
सदर शैक्षणिक सहल ही नियोजित वेळेत पूर्ण करून विद्यार्थ्याची गैरसोय न होता पूर्ण झाली.