मराठा विद्या प्रसारक समाज व कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात कृषि मेळावे आयोजित करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी दि. २७/ १२/२०२३ रोजी कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह नाशिक येथे वार्षिक मेळावा आयोजनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास उद्घाटक म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक चे कुलगुरू मा. प्रा. संजीवजी सोनवणे, लाभले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद मविप्र समाजाचे सरचिटणीस मा. अॅड. नितीनजी ठाकरे यांनी भूषविले. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक मा. डॉ.विलासजी शिंदे व नाशिक विभागाचे कृषि सहसंचालक मा. श्री. मोहनजी वाघ हे उपस्थित होते. कार्यक्रमास मविप्र समाजाचे अध्यक्ष मा. डॉ. सुनीलजी ढिकले, उपाध्यक्ष मा. श्री. विश्वासजी मोरे, सभापति मा. श्री. बाळासाहेब क्षिरसागर उपसभापति मा श्री देवरामजी मोगल, चिटणीस मा श्री दिलीपजी दळवी, म वि प्र संचालक मंडळ तसेच कृषि महाविद्यालयाचे स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य यांनी विशेष उपस्थिती दर्शवीली.
कृषि मेळावा उद्घाटन