म वि प्र समाज संस्था नाशिक व कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषि महाविद्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या कृषि मेळावा शृंखलेतील पहिला कृषि मेळावा हा दिंडोरी तालुक्यात जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी येथे घेण्यात आला. या कृषि मेळाव्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म वि प्र सरचिटणीस मा ॲड नितीनजी बाबुराव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अध्यक्ष व कार्यकारी संचालक सह्याद्री फार्मस प्रोड्यूसर कंपनीचे मा श्री विलासजी शिंदे, मा श्री अशोकराव गायकवाड (अध्यक्ष द्राक्ष बागायतदार संघ), मा श्री मोहनजी वाघ (विभागीय कृषि संचालक नाशिक विभाग), यांचे शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा डॉ सुनील उत्तमराव ढिकले (अध्यक्ष म वि प्र समाज नाशिक), मा श्री विश्वास बापूराव मोरे (उपाध्यक्षम वि प्र समाज नाशिक), मा श्री बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर (सभापती म वि प्र समाज नाशिक), मा श्री देवराम बाबुराव मोगल (उपसभापती म वि प्र समाज नाशिक), मा श्री दिलीप सखाराम दळवी (चिटणीस म वि प्र समाज नाशिक), दिंडोरी तालुका संचालक मा श्री प्रवीण एकनाथ जाधव, डॉ अजित मोरे (शिक्षणाधीकारी म वि प्र समाज नाशिक) आणि कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बापूसाहेब भाकरे,यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला
दिंडोरी कृषि मेळावा