कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय नाशिकच्या प्रांगणात शिवजन्मोत्सव सोहळा दि. 19 फेब्रुवारी 2024 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास म वि प्र समाज संस्थेचे सरचिटणीस मा. अॅड. नितीनजी ठाकरे, अध्यक्ष मा .डॉ.सुनीलजी ढिकले, उपाध्यक्ष मा. श्री. विश्वासजी मोरे. चिटनीस मा. श्री. दिलीपजी दळवी, संचालक, मा. ॲड. लक्ष्मणजी लांडगे, मा. ॲड. संदिपजी गुळवे तसेच स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. शिवजन्मोत्सव प्रसंगी शिवछत्रपती आरती प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाली. याप्रसंगी मा.सरचिटणीस यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. शिवचरित्रावर विद्यार्थ्यांनी लघु नाट्य, पोवाडा, शिवगीते सादर केली. तसेच महाविद्यालय परिसरात ढोल ताश्यांच्या गजरात विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली.
शिव जयंती उत्सव