mvps

Est. Since 2003

mcaer_logo

Maratha Vidya Prasark Samaj's

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri )

मराठा विद्या प्रसारक समाजाचे

कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक

( महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न )

mpkv mcaer_a

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)

Students’ Council for the Academic Year ( 2023-24)

शैक्ष. वर्ष 2023-24 मध्ये विद्यापीठ नियमानुसार विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली.
सदर विद्यार्थी परिषदेवर शैक्षणिक गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड होत असते. त्या अनुषंगाने महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेवर तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु. वीर मृणाली विकास हिची चेअरमन म्हणून निवड झाली. तसेच जनरल सेक्रेटरी (GS) म्हणून कु. वदक कोमल प्रकाश हिची निवड झाली. सदर परिषदेचे अध्यक्ष हे महाविद्यालयाचे प्राचार्य असतात. विद्यापीठ नियमानुसार परिषदेवर पाच समित्या गठित करण्यात आल्या. ह्या समित्यांवर गुणवत्तेनुसारच विद्यार्थी निवड करण्यात आली. प्रत्येक समितीवर संयोजक आणि सदस्य म्हणून निवड झालेले विद्यार्थी तसेच सल्लागार म्हणून महाविद्यालयातील प्राध्यापक यांची नेमणूक करण्यात आली.
ह्या विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण सोहळा दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडला. पदग्रहण सोहळ्याचे प्रस्ताविक हे महाविद्यालय विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. संगिता कडलग यांनी केले. या पदग्रहण सोहळ्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ. बापूसाहेब भाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांची काय जबाबदारी असते किंवा त्यांची कामे यासंदर्भात माननीय प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. आभार प्रदर्शन परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. विशाल गमे यांनी केले.

विद्यार्थी परिषदेचा(Students’ Council)पदग्रहण सोहळा २०२३-२०२४
Scroll to top