मविप्र समाजाचे, कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन “वृक्षवल्ली-2024” (फेस्टिवल ऑफ फूट प्रिंट्स) साजरे करण्यात आले. दी. 1 मार्च 2024 रोजी वेगवेगळे डेज, क्रीडास्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा व कार्यक्रम यांचे बक्षीस वितरण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व महाविद्यालयाचे वार्षिक नियतकालिक “बहर” च्या सातव्या आवृत्तीचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप-प्रज्वलन व समाज गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. विश्वास बापूराव मोरे (उपाध्यक्ष, मविप्र समाज नाशिक) हे होते. तसेच सन्माननीय उपस्थिती मा.श्री बाळासाहेब क्षीरसागर (सभापती, मवीप्र समाज नाशिक) मा. श्री. देवराम बाबुराव मोगल (उपसभापती, माविप्र समाज नाशिक) मा. श्री. दिलीप सखाराम दळवी (चिटणीस मविप्र समाज नाशिक) व मा. डॉ. अजित विश्वास मोरे (शिक्षणाधिकारी मवीप्र समाज नाशिक) हे होते. तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अनिकेत चव्हाण (सिने कलाकार) श्रीमती अस्मिता दुधारे (शिवछत्रपती पुरस्कारार्थी, आंतरराष्ट्रीय तलवारबाजी खेळाडू) हे उपस्थित होते. सोबतच कार्यक्रमासाठी व्यासपीठावर मा. श्री. प्रवीण एकनाथ जाधव (संचालक, मविप्र समाज दिंडोरी व पेठ) मा. श्री. लक्ष्मण फकीरा लांडगे (संचालक, मविप्र समाज नाशिक शहर) मा. श्री. अमित उमेद सिंग बोरसे (संचालक मविप्र समाज नांदगाव) मा. ॲड. संदीप गोपाळराव गुळवे (संचालक मविप्र समाज इगतपुरी) मा. श्री. रमेश पांडुरंग पिंगळे (संचालक मविप्र समाज नाशिक ग्रामीण) व स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. बापूसाहेब द.भाकरे यांनी केले. पारितोषिक व गुणगौरव समारंभामध्ये विद्यार्थ्यांना एकूण २० गोल्ड मेडल,
19 सिल्वर मेडल
व 7 ब्रांझ मेडल देण्यात आले. असे एकूण 46 पुरस्कार प्रदान करण्यात आले सोबतच स्टुडन्ट ऑफ द इयर व क्रीडा स्पर्धेसाठी विजेतेपद व उपविजेतेपद अशा ट्रॉफी सुद्धा मा. अध्यक्ष व सर्व उपस्थित मा. संचालक, आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. विश्वास बापूराव मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये आपण काही दिवसांमध्ये महाविद्यालयाच्या नवीन प्रशस्त इमारतीमध्ये स्थलांतरित होत असल्याचे व भविष्यात लवकरच आय.सी.ए.आर. ऍक्रेडिटेशन आपण मिळवू व त्यासाठी संस्थेचा पूर्ण पाठिंबा राहील असे आश्वासन दिले. कृषी महाविद्यालयाच्या कृषी महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या उपक्रमा बद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे मा. सरचिटणीस ॲड. डॉ. नितीन बाबुराव ठाकरे सो. यांनी अभिनंदन केल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन “वृक्षवल्ली 2024” चे समन्वयक व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. पंकजसिंह बी चौहाण व विद्यार्थी परिषद चेअरमन कु. वीर मृणाली व विद्यार्थी परिषद स्नेहसंमेलन सचिव कु. वदक कोमल यांनी केले, तसेच पारितोषिक वितरण उद्घोषण व आभार डॉ. विशाल गमे यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
वृक्षवल्ली 2024 (फेस्टिवल ऑफ फुट प्रिंट्स) या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाच्या सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी घेतलेल्या एकत्रित सहभाग व परिश्रमाबद्दल मा. प्राचार्य डॉ. बापूसाहेब द. भाकरे यांनी सर्वांची प्रशंसा व अभिनंदन केले. अभिनंदन केल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन “वृक्षवल्ली 2024” चे समन्वयक व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. पंकजसिंह बी चौहाण व विद्यार्थी परिषद चेअरमन कु. वीर मृणाली व विद्यार्थी परिषद स्नेहसंमेलन सचिव कु. वदक कोमल यांनी केले, तसेच पारितोषिक वितरण उद्घोषण व आभार डॉ. विशाल गमे यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
वृक्षवल्ली 2024 (फेस्टिवल ऑफ फुट प्रिंट्स) या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाच्या सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी घेतलेल्या एकत्रित सहभाग व परिश्रमाबद्दल मा. प्राचार्य डॉ. बापूसाहेब द. भाकरे यांनी सर्वांची प्रशंसा व अभिनंदन केले.