मराठा विद्या प्रसारक समाजाचे, कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक चे वार्षिक स्नेहसंमेलन “वृक्षवल्ली 2024” (फेस्टिवल ऑफ फूट प्रिंट्स) साजरे करण्यात आले. दी. 27 फेब्रू. ते 1 मार्च 2024 पर्यंत एकूण 4 दिवस चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळे डेज, क्रीडास्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये – सोलो सॉंग, ग्रुप सॉंग, सोलो डान्स, ग्रुप डान्स, मिमिक्री, स्टँड अप कॉमेडी, एकांकिका, मूकनाट्य, फॅशन शो, इत्यादींचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 1 मार्च 2024 रोजी “वृक्षवल्ली 2024” या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष मा. डॉ. सुनील उत्तमराव ढिकले, माविप्रचे उपाध्यक्ष मा. श्री. विश्वास बापूराव मोरे, सभापती मा. श्री बाळासाहेब क्षीरसागर, यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. देवराम मोगल (उपसभापती मवीप्र समाज) मा. श्री. दिलीप दळवी (चिटणीस मविप्र समाज) मा. एडवोकेट लक्ष्मणजी लांडगे (संचालक नाशिक शहर) हे उपस्थित होते. तदनंतर कार्यक्रमाची सुरुवात मराठा विद्या प्रसारक समाजाचे “समाज गीत” व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे “विद्यापीठ गीत” याद्वारे केल्या गेली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. बापूसाहेब द.भाकरे यांनी केले. उद्घाटनाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये मा. डॉ. सुनील ढिकले यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले तसेच संस्थेतर्फे महाविद्यालयास या उपक्रमासाठी सदिच्छा दिल्या. शिक्षणासोबतच सांस्कृतिक क्रीडा इत्यादी विविध स्पर्धांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी भाग घेतल्यास व्यक्तिमत्त्वामध्ये बराच बदल व सर्वांगीण विकास दिसून येतो असे त्यांनी सांगितले. त्यानंतर पूर्ण दिवस वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होऊन वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन “वृक्षवल्ली 2024” चे समन्वयक व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. पंकजसिंह बी चौहाण व विद्यार्थी परिषद चेअरमन कु. वीर मृणाली आणि विद्यार्थी परिषद स्नेहसंमेलन सचिव कु. वदक कोमल यांनी केले. कार्यक्रमाची काही क्षणचित्रे.