mvps

Est. Since 2003

mcaer_logo

Maratha Vidya Prasark Samaj's

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri )

मराठा विद्या प्रसारक समाजाचे

कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक

( महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न )

mpkv mcaer_a

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)

मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक , महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 5 मार्च ते 11 मार्च २०२४ या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना शिबिर पिंपळगाव(निपाणी) सावळी या गावात आयोजित करण्यात आले.

या कालावधीत विविध उपक्रम राबवण्यात आले. तसेच व्याख्याने देखील घेण्यात आली.

मंगळवार, दिनांक ५ मार्च रोजी शिबिराचा पहिला दिवस-

सकाळ – मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडला. त्यावेळी मा. श्री. बाळासाहेब क्षीरसागर साहेब हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री. महावीर सिंग चौहान सर , मा.श्री. देवराम मोगल सर , कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मा.श्री. जगन अप्पा कुटे , मा. श्री. सुरेश नाना कमान कर जिल्हा परिषद सदस्य , सायखेडा , मा.सौ. छायाताई बोडके सरपंच , मा.सौ. वच्छलाताई बोडके उपसरपंच, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. डी. भाकरे सर , ज्ञानेश्वर खाडे माजी चेअरमन  गहू संशोधन केंद्र निफाडचे डॉ. सुरेश दोडके सर आणि योगेश पाटील सर इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. यांच्या हस्ते द्वीपप्रज्जवलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आले.

दुपार – श्री क्षेत्र खंडेराव महाराज देवस्थान व महादेव मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

बुधवार, दिनांक ६ मार्च रोजी शिबिराचा दुसरा दिवस –

सकाळ – क. दु. सी.पाटील महाविद्यालयातील कृषी कीटक शास्त्र विभागाचे प्रा.डॉ.दीपक शिंदे सर आणि प्रा.डॉ. संदीप आहेर सर यांचे मधमाशी पालनाचे महत्त्व व सध्याच्या परिस्थितीत भाजीपाला कीडनियंत्रण या विषयावर अनमोल मार्गदर्शन लाभले.

दुपार – सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती या विषयावर विद्यार्थ्यांमध्ये वाद – विवाद स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर श्री कृष्ण मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

गुरुवार, दिनांक ७ मार्च रोजी शिबिराचा तिसरा दिवस –

सकाळ – क.दू.सी.पाटील महाविद्यालयातील प्रा.डॉ.प्रतीक्षा पवार मॅडम व प्रा.नयन गोसावी मॅडम यांनी कृषी व्यवसायात माती परिक्षणाचे महत्त्व या विषयावर ग्रामस्थांना अनमोल मार्गदर्शन केले.

दुपार – पिंपळगाव(निपाणी) या गावात वृषारोपण करण्यात आले.

शुक्रवार, दिनांक ८ मार्च रोजी शिबिराचा चौथा दिवस –

सकाळ – विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती संदर्भात पथनाट्य सादर केले. हे पथनाट्य महादेव मंदिर परिसरात सादर करण्यात आले. त्यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

दुपार – पिंपळगाव(निपाणी) आणि सावळी गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात शेती, पशुपालन, लोकसंख्या, शेतीपध्छती, शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणी इत्यादी माहितीचे सर्वेक्षण करण्यात आले.

शनिवार, दिनांक ९ मार्च रोजी शिबिराचा पाचवा दिवस –

सकाळ – सावळी गावातील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी गावच्या सरपंच सौ.छायाताई बोडके , उपसरपंच वाच्छलताई बोडके मा. श्री . किरण जाधव  इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.

दुपार – श्री.स्वप्नील देवरे सर ,देवरे अकॅडमी नाशिक यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी विविध स्पर्धा परीक्षा बद्दल अनमोल मार्गदर्शन केले.

रविवार, दिनांक १० मार्च रोजी शिबिराचा सहावा दिवस –

सकाळ – मा. श्री. राजेंद्र आहेर सर, यश फाऊंडेशन नाशिक यांचे एड्स जनजागृती आणि पुनर्वसन कार्यक्रम या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी या विषयावर अनमोल मार्गदर्शन केले.

त्यानंतर सावळी येथे लावलेल्या झाडांना पाणी घालण्यात आले.

दुपार – सावळी येथे हनुमान मंदिर परिसरात तसेच प्राथमिक शाळा परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

सोमवार, दिनांक ११ मार्च रोजी शिबिराचा सांगता दिवस-

सकाळी १०.०० वा. सदर समारोप कार्यक्रम मराठा विद्या प्रसारक संस्थेचे उपसभापती, मा. देवराम मोगल यांच्या अध्यक्षेखाली व मा. शिवाजी गडाख संचालक, (निफाड),  म. वि. प्र. समाज, नाशिक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, तसेच कार्यक्रम प्रसंगी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे, श्रीमती छाया बोडके सरपंच, पिंपळगाव निपाणी, श्रीमती वत्सलाबाई बोडके, उपसरपंच, पिंपळगाव निपाणी, श्री. राहुल सोनवणे ग्रामसेवक, ज्ञानेश्र्वर खाडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सदर शिबिरात एकुण ५०  स्वयंसेवक ( मुली २७ व मुले २३) विद्यार्थांनी सहभाग नोंदविला.

 

राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबीर २०२३-२०२४
Scroll to top