मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय, नाशिक यांच्यावतीने मविप्र कार्यालयाच्या आवारात १ जुलै रोजी कृषीदिन कै. वसंतरावजी नाईक माजी मुख्यमंत्री यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिन व वृक्षदिंडी काढून हा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज व कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या पुतळ्याना व कै. वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेला हारअर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मविप्रचे सरचिटणीस ऍड. नितीनभाऊ ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांनी कै. वसंतरावजी नाईक यांचे शेती व कृषी क्षेत्रातील योगदान याबद्दल माहिती दिली. राज्यात चार विद्यापीठाच्या स्थापनेत कै. वसंतरावजी नाईकांचा सिहांचा वाटा होता असे त्यांनी ठळकपणे नमूद केले. तर मा. सरचिटणीस ऍड. नितीनभाऊ ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना 1972-73 च्या दुष्काळात उत्पादन वाढी संदर्भात नाईक साहेबांनी केलेल्या उपाययोजना व अन्नधान्य उत्पादन वाढी संदर्भात घेतलेले निर्णय याबाबत त्यांनी विषद केले. मविप्रच्या कृषि महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावरही जलसंधारणाची कामे व नवीन प्रयोग घेण्याचा मानस बोलून दाखवला, तसेच कै. वसंतरावजी नाईक यांचा जीवनपट व त्यांचे कार्य विषद केले. कार्यक्रमास मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ अजित मोरे, डॉ विलास देशमुख, डॉ लोखंडे, डॉ. शिंदे सर, व कृषी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर सेवक तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम आधिकारी एस.यू.सुर्यवंशी, स्वयंसेवक विद्यार्थी, इतर विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पंकजसिंह चौहाण यांनी केले. कृषिदिनाचे औचित्य साधून कृषिमहाविद्यालय व गंगापूर रोड परिसरात वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, सेवक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संखेने सहभागी झाले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात कृषि तंत्रनिकेतनचे प्राचार्य, सेवक वर्ग व व विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.
मविप्र कृषिमहाविद्यालयाच्या वतीने साजरा केलेल्या कृषिदिन व कै. वसंतराव नाईक यांची जयंती प्रसंगी, उपस्थित मा. ऍड. नितीनजी ठाकरे साहेब, सरचिटणीस मविप्र समाज नाशिक, मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ अजित मोरे, डॉ विलास देशमुख, डॉ लोखंडे, डॉ. शिंदे सर, व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर सेवक व विद्यार्थी.