दि. ५/१२/२०२४ रोजी ‘माय भारत अभियाना‘ अंतर्गत भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, क्रीडा व युवकसेवा संचालनालय, (महाराष्ट्र राज्य पुणे) अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक नेहरू युवा केंद्र, नाशिक व मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२४ आयोजित केला गेला. त्यात कथालेखन व काव्यलेखन स्पर्धांतून दोघांची विभाग स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कु. अथर्व विश्वास केळकर याला काव्यलेखन आणि कथालेखन या दोन्ही स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक तर कु. वैष्णवी सुभाष देवरे हिचा कथालेखनात तृतीय क्रमांक मिळाला असून दोघांचीही निवड विभागीय स्तरावर कथालेखनासाठी करण्यात आली आहे.विद्यार्थांचे हार्दिक अभिनंदन!!!