मराठा विद्या प्रसारक समाज संस्थे तर्फे आयोजित माविप्र युवास्पंदन 2025 अंतिम फेरीमध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिकच्या दोन विद्यार्थ्यांनी यश संपादित केले.
रांगोळी स्पर्धेच्या अंतिम निकालात महाविद्यालयाची कुमारी गायत्री आहेर हिने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच फोटोग्राफी या स्पर्धेमध्ये चारुदत्त मोरे या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक पटकावला. शिक्षण अधिकारी डॉ. अजित मोरे सर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब द. भाकरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.