मविप्र च्या कृषी महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी कॅप्टन डॉ.राजेंद्र भि. सनेर-पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली त्रिसूत्री
मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयामध्ये दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी वृक्षवल्ली -२०२५ “उत्सव पाऊल खुनांचा” स्नेहसंमेलन कार्यक्रम व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ रावसाहेब थोरात सभागृहामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. दि. २० फेब्रुवारी २०२५ ते २६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान महाविद्यालयात विविध डेज ग्रुप डे, मिसमॅच डे, ट्रॅडीशनल डे, टाय डे, सारी डे, रेट्रो डे, बॉलीवूड डे आणि क्रीडा प्रकार क्रिकेट, हॉलीबॉल, कबड्डी, खो खो, फुटबॉल, चेस व कॅरम उत्साहात साजरे करण्यात आले. त्याचसोबत विविध शैक्षणिक व मनोरंजनात्मक स्पर्धा जसे निबंध, वक्र्तृत्व, प्रश्नमंजुषा, वादविवाद सोबतच संगीत खुर्ची, लिंबू चमचा, कविता वाचन व लेखन पार पडल्या.
सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन सकाळी ०९.३० वाजता मा. एड. लक्ष्मण लांडगे, संचालक, मविप्र, समाज नाशिक शहर, मा.श्री.अजित मोरे, शिक्षणाधिकारी, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बापूसाहेब भाकरे यांच्या हस्ते झाले. सोबत सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षक प्रा.दिनकर दांडेकर आणि प्रा.श्रीमती शीतल कारे उपस्थित होते.
या महोत्सवासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस , मा.ऑड.नितीन ठाकरे, ,डॉ.सुनील ढिकले ,अध्यक्ष ,मा.श्री.विश्वास मोरे, उपाध्यक्ष, मा.श्री.बाळासाहेब क्षीरसागर ,सभापती, मा.श्री.दिलीप दळवी, चिटणीस , तसेच मविप्र च्या सर्व संचालकांनी हार्दिक शुभेछया दिल्या.स्नेहसंमेलन कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध एकल व सांघिक नृत्य ,एकपात्री नाटक ,काव्यवाचन, फॅशन शो ,माईम एकपात्री विनोद, अनेक गाणी सादर केले व कार्यक्रमाची शोभा वाढविली.
त्याच दिवशी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा दुपारी ४.०० वाजता रावसाहेब थोरत सभागृह मध्ये पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.कॅप्टन डॉ.राजेंद्र भि.सनेर-पाटील ,महाव्यवस्थापक,महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.देवराम मोगल ,उपसभापती ,मराठा विद्या प्रसारक समाज,नाशिक तथा अध्यक्ष स्थानिक व्यवस्थापन समिती कृषी महाविद्यालय नाशिक हे होते. मा डॉ.सयाजीराव गायकवाड साहेब ,संचालक ,चांदवड मा.श्री.ऑड .लक्ष्मण लांडगे,संचालक नाशिक शहर ,मा.श्री.रमेश पिंगळे,संचालक ,नाशिक ग्रामीण,मा.श्री.डॉ.अजित मोरे ,शिक्षणाधिकारी,मराठा विद्या प्रसारक समाज ,नाशिक तसेच स्थानिक व्यवस्थापन समिती चे कृषिभूषण मा . श्री तुकाराम बोराडे ,मा श्री.अरुण पिंगळे ,मा.श्री.चिखले हे उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यालयाचे वार्षिक नियतकालिक बहर-२०२४ तसेच वार्तापत्र -सप्टेंबर ते डिसेंबर २०२४ चे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कॅप्टन डॉ.राजेंद्र भि.सनेर-पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आपल्या मनोगतामध्ये या प्रतिष्टीत संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात उपस्थित राहण्याचा सन्मान व सौभाग्य एक कृषीपदवीधर असल्याने खूपच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले व या संस्थेच्या नावलौकिकाबाबत पूर्वीपासूनच मनात आदरभाव होता असे प्रतिपादन केले.विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी पूर्वी मेडिकल,इंजिनिअरिंग, प्रशासकीय सेवा , पोलीस सेवा ,फॉरेस्ट सेवा कडे विद्यार्थ्यांचा ओढा होता.पण आता प्रगत तंत्रज्ञानामुळे त्याच्याही पुढील संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा असा मूलमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला आणि चिकाटी,धैर्य व प्रामाणिकता या त्रिसूत्रीच्या जोरावर कोणत्याही पदावर व कोणत्याही क्षेत्रात विद्यार्थी स्वतःचा नावलौकिक वाढवू शकता असे त्यांनी विद्यार्थ्यंना सांगितले.
आपण या सर्व महत्वाच्या क्षेत्राचे भविष्य आहात असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीबद्दल शुभेछया दिल्या . महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनी कु.वैष्णवी देवरे हिला उत्कृष्ट विद्यार्थीनि २०२४-२५ म्हणून गौरविण्यात आले. दरवर्षी दिले जाणारे जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी चतुर्थ वर्षाला देण्यात आली.कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बापूसाहेब डी.भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन महाविद्यालय विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.व्ही .एन.गमे यांनी केले.कृषी महाविद्यालयाचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.पंकजसिंह चौहाण यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापिकेतर कर्मचारी व इतर सेवक वृंद तसेच महाविद्यालय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसही प्रयत्न केले.
–