के.डी.एस.पी.कृषी महाविद्यालयात “शिवजन्मोत्सव सोहळा ” उत्साहात संपन्न
मराठा विद्या प्रसारक समाज संचालित कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयात दरवर्षी प्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात “शिवजन्मोत्सव सोहळा “ साजरा करण्यात आला. शिवजयंती निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. 30 वादकांच्या ढोल पथकासह सकाळी ८ वाजता महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक महाविद्यालयाच्या परिसरातून काढण्यात आली. प्रभात फेरी उदाजी महाराज ऐतिहासिक संग्रहालय मार्गे नेऊन तेथे शाहू महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले व सावरकर नगर मार्गे मिरवणूक महाविद्यालयात दाखल झाली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व शिवआरतीने करण्यात आली. चतुर्थ वर्ष विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महारांजावरील ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्यासाठी समूहनृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस मा. ॲड. नितीन ठाकरे हे होते. तर शिवव्याख्याते श्री. सोमनाथ वसंत गायखे यांचे प्रमुख वक्ते म्हणून व्याख्यान झाले. त्यांनी महारांचा जीवनपट त्यांची तत्त्वे व कार्ये यावर विद्यार्थ्यांना माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात ॲड. नितीन ठाकरे यांनी महाराजांचे कृषी धोरणे व राजकीय व्यवस्था याबद्दल विद्यार्थ्यांना संबोधित केले. तसेच कार्यक्रम उत्कृष्ट नियोजनांबद्दल वैद्यार्थ्यांचे कौतुक करून सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या व महाविद्यालयाच्या सप्टेंबर ते डिसेंबर वार्तापत्र चे अनावरण सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बापूसाहेब भाकरे यांनी केले व कार्यक्रम साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. तसेच सर्वांना शिवजयंती बद्दल शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र समाज संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.विश्वास मोरे, उपसभापती मा.श्री.देवराम मोगल, चिटणीस मा श्री. दिलीप दळवी हे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थिती मविप्र संस्थेचे संचालक (नाशिक शहर) मा.ॲड. लक्ष्मणजी लांडगे, (नाशिक ग्रामीण) चे मा. श्री. रमेशजी पिंगळे, तालुका संचालक मा. श्री. ॲड. संदीप गुळवे, मा. श्री. विजय पगार,सेवक संचालक मा श्री. चंद्रजीत शिंदे होते. तसेच शिक्षणाधिकारी मा. डॉ. अजित मोरे, डॉ पाटील यांनीही उपस्थिती दर्शविली. स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य कृषिभूषण श्री. तुकाराम बोराडे श्री. अशोक पगार हे हि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्यार्थिनी कु. वैष्णवी देवरे व कु.साक्षी कासार यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी केले होते. आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. पंकजसिंह बी.चौहाण यांनी केले. तर कार्यक्रमास सर्व प प्राध्यापक, प्राध्यापकेतर सेवक वृंद व सर्व वर्षातील विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचा सहभाग होता.