कृषि महाविद्यालयामध्ये राजश्री छत्रपति शाहू महाराज यांची जयंती साजरी
महान समाज सुधारक राजश्री छत्रपति शाहू महाराज यांची जयंती दि.२६ जून२०२५ रोजी म. वि.प्र. कर्मयोगी दुलाजी सिताराम कृषि महाविद्यालयामध्ये साजरी करण्यात आली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र” असे म्हणतात. लोकशाहीवादी, समाजसुधारक आणि सक्षम राज्यकर्ते असे राजश्री छत्रपति शाहूमहाराज यांनी त्यांच्या राजवटीत अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. संपूर्ण जीवनभर सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी प्रयत्न केले आणि सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बापूसाहेब द. भाकरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.