वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ मा. डॉ. एन. जी. पाटील यांचे म. वि. प्र . कृषी महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
महात्मा फुले कृषी विद्यापीठ संचालित मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयात दिनांक १८ जुले रोजी मा. डॉ. एन. जी. पाटील संचालक, एन. बी. एस. एस. नागपूर (भारतीय कृषी अनुसंधान परिषद, संचालित) याच्या “Artificial Intelligence in Natural Resource Mapping” या महत्वाच्या विषयावर मार्गदर्शनपर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमच्या प्रास्तविका दरम्यान बोलतना महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून ते सक्षम व्हावेत या उद्देशाने विविध क्षेत्रातील प्रभावी मान्यवरांना मार्गदर्शन करण्यासठी बोलावले जाते असे सांगितले. याप्रसंगी प्राचार्यांनी प्रमुख मार्गदर्शक डॉ. एन. जी. पाटील यांची ओळख उपस्थित विद्यार्थी आणि महाविद्यालयाच्या कर्मचार्यांना करुन दिली. याप्रसंगी बोलतना प्राचार्यांनी डॉ. एन. जी. पाटील यांचा शालेय जीवनापासून भारतीय कृषीअनुसंधान परिषद मार्फत कृषी शास्त्रज्ञ होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास उपस्थिताना सांगितला.तसेच डॉ. एन. जी. पाटील संचालक,एन. बी. एस. एस. नागपूर या पदावर कार्यरत असताना केलेल्या राज्य आणि देश पातळीवरील विशेष योगदानाचे वर्णन केले.
यांनतर प्रमुख मार्गदर्शक डॉ. एन. जी. पाटील यांनी बोलताना प्रथम भारतीय कृषी अनुसंधान परिषद, संचालित एन. बी. एस. एस. नागपूर या संस्थेच्या रचनेची आणि संस्थेच्या देशपातळीवरील कामाची माहिती दिली. सदर संस्थेचे देशभरातील विविध भागातील विभागीय केंद्राद्वारे मातीचे सर्वेक्षण करुन त्या आधारे शेती आणि त्यासोबतच विविध विकासात्मक संस्थाना उपयोगी असे मार्गदर्शन करत असल्याचे सांगितले. तसेच सद्य बदलते आधुनिक तंत्रज्ञान अवगत करत सध्या सदर संस्था कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) चा वापर प्रभावीपणे करत असल्याचे नमूद केले. याप्रसंगी डॉ. एन. जी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता विविध आयामांचे कोशल्य अवगत करुन भविष्यात करियर करण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.
सदर मार्गदर्शनपर व्याख्यांनानंतर विद्यार्थ्यांनी अत्यंत सोप्या भाषेत कृत्रिम बुद्धिमतेचा शेती आणि शेतकरी विकासात वापर याची माहितीमुळे आत्मविश्वास वाढल्याचा प्रतिसाद दिला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नयन गोसावी आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक सुधीर शिंदे यांनी केले.