कृषी महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ 2025
मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, चाचडगाव ता.दिंडोरी येथे दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दीक्षारंभ कार्यक्रम दोन आठवड्यासाठी आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्री. बाळासाहेब क्षीरसागर सभापती, मविप्र समाज, नाशिक उपस्थित होते. मा.श्री.आप्पासाहेब शिंदे, प्रांताधिकारी, दिंडोरी व मा.श्री. सुमित निर्मळ, आर.एफ.ओ ,नाशिक, श्री.प्रवीण नाना जाधव, संचालक, दिंडोरी व माजी प्राचार्य श्री.संपतराव काळे, के.टी.एच.एम. महाविद्यालय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सदर कार्यक्रमास शिक्षणाधिकारी डॉ.अजित मोरे व डॉ.डी.डी.जाधव, डॉ.बापूसाहेब भाकरे, प्राचार्य, कृषी महाविद्यालय उपस्थिती होते.
दिक्षारंभ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध व्याख्यान, प्रक्षेत्र भेटी, शैक्षणिक भेटी, माजी विद्यार्थ्यांचे व्याख्यान तसेच प्रगतीशील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर जाऊन प्रत्यक्ष शेतीशी निगडित असलेले अनुभव देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना शेतीशी निगडित नाविन्यपूर्ण अनुभव मिळतील.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांनी केले. दीक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत पुढील दोन आठवड्याचा कार्यक्रम त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. मा.श्री. बाळासाहेब क्षीरसागर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विदयार्थ्यांना कृषी शिक्षणाचे महत्व सांगून पुढील वाटचालीबद्दल शुभेछया दिल्या. मा.श्री.आप्पासाहेब शिंदे प्रांताधिकारी, दिंडोरी यांनी कृषी शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धात्मक परीक्षा तसेच त्यासाठी करावयाची तयारी याबद्दल मार्गदर्शन केले. मा.श्री. सुमित निर्मळ, वनक्षेत्र अधिकारी, नाशिक यांनी विद्यार्थ्यांना सांगितले कि आतापासूनच आपले ध्येय निच्चीत करून प्रयत्न केले तर यश मिळणे अतिशय सोपे असते. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. अजित मोरे यांनी कृषी महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधेबद्दल माहिती देत याचा वापर करून प्रत्येक विद्यार्थ्याने पुढील आयुष्यात यशस्वी होण्याबद्दल शुभेछया दिल्या. श्री.प्रवीण नाना जाधव, संचालक, दिंडोरी यांनी विद्यार्थ्यांना जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करून पुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शुभेछया दिल्या.
कृषी महाविद्यालय चाचडगाव येथे स्थलांतरित झाल्यानंतर हि पहिलीच तुकडी येथे हजार झालेली आहे. पहिलेच वर्ष असून सुद्धा या ठिकाणी सर्व १२० जागांसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, हे मराठा विद्या प्रसारक समाजाच्या चांगल्या शिक्षण पद्धतीचे प्रशस्ती पत्र आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. प्रथम वर्षातील प्रतीक सावंत,सिद्धी गांगुर्डे आणि अदित्य गंडे तसेच द्वितीय वर्षातील आरुषी सिंग यांनी महाविद्यालयबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका नयन गोसावी तसेच आभार प्रदर्शन प्राध्यापक विशाल गमे यांनी केले.