शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण समारंभ
शैक्ष. वर्ष 2024-25 मध्ये विद्यापीठ नियमानुसार विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली. सदर विद्यार्थी परिषदेवर शैक्षणिक गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड होत असते. त्या अनुषंगाने महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेवर तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु. देशमुख साक्षी ज्ञानेश्वर हिची चेअरमन म्हणून निवड झाली. तसेच जनरल सेक्रेटरी (GS) म्हणून पाचपेंड केशव रमेश ह्याची निवड झाली. सदर परिषदेचे अध्यक्ष हे महाविद्यालयाचे प्राचार्य असतात. […]