वृक्षारोपण, वृक्षदिंडी, कृषीदिंडी ने वेधले लक्ष..!
नाशिक :मराठा विद्या प्रसारक समाजाच्या चाचडगाव येथील कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयात कृषी दिना निमित्त मंगळवारी (दि.१जुलै२०२५) आयोजित वृक्षारोपण, वृक्षदिंडी, कृषीदिंडी ने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
महाविद्यालयाच्या निसर्गरम्य परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांचे, शेतीचे महत्व आणि पर्यावरणामध्ये वृक्षसंवर्धनाचे महत्व दर्शवणाऱ्या घोषणा देत वृक्षदिंडी काढली. कृषीदिना निमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास मोरे, संचालक प्रवीण जाधव, ॲड. संदीप गुळवे, ॲड. लक्ष्मण लांडगे, विजय पगार, शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे, माजी नगरसेवक मनोहर बोराडे, कृषिभूषण भूषण निकम आदी उपस्थित होते.
मान्यवर व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांचे, शेतीचे आणि वृक्षसंवर्धनाचे महत्व दर्शवणाऱ्या घोषणा देत वृक्षदिंडी ने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसतंराव नाईक यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांनीकार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकामधे प्राचार्यानी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे कृषी क्षेत्रातील योगदान हे महत्वपूर्ण असून महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठ स्थापनेमध्ये त्यांचा सिंहाचा वाट असल्याचे उपस्थितांना सांगितले.याप्रसंगी मविप्रचे उपाध्यक्ष विश्वास मोरे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी सर्व सुविधांनी सुसज्ज असणाऱ्या या महाविद्यालयातील शिक्षणाचा उपयोग शेतकऱ्याच्या सेवेसाठी करण्याचे आवाहन केले. संचालक प्रवीण जाधव यांनी माजी मुख्यमंत्री वसतंराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल माहिती देत भविष्यात विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे यांनी शेतीमध्ये होणारे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले तर नक्कीच शेतकऱ्यांचे उत्पन वाढेल, असे मत व्यक्त केले. विद्यार्थिनी वैष्णवी बनसोडे हिने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाच्या न्यूजलेटरचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. नयन गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थिनी यज्ञा ठुबे हिने आभार मानले.
मविप्रच्या कृषी महाविद्यालयात कृषी दिन साजरा