मविप्र कृषी महाविद्यालयात जागतिक वन दिन, जागतिक जल दिन व जागतिक हवामान दिन उत्साहात साजरा
मविप्र समाज संचलित चाचडगांव येथील केडीएसपी कृषि महाविद्यालयात दरवर्षी प्रमाणे दि. २३ मार्च रोजी जागतिक वन दिन, जागतिक जल दिन व जागतिक हवामान दिन संयुक्तपणे साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मेरी येथील संशोधन सहाय्यक मा.श्री. कुणाल पाटील तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ. बापूसाहेब भाकरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. धीरज निकम यांनी केले.
सदर प्रसंगी द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी कु. संजना गडकर व कृषिविद्या विभागतील प्राध्यापक डॉ. विशाल गमे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री. कुणाल पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधीर शिंदे यांनी केले व डॉ. विशाल गमे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.






