म. वि. प्र. कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सह्याद्री फार्म्सला अभ्यास भेट
नाशिक (चाचडगाव): मविप्र समाजाच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, चाचडगाव येथील चतुर्थ सत्रातील ८९ विद्यार्थ्यांनी मोहाडी येथील ‘सह्याद्री फार्म्स’ला भेट देऊन कृषी-प्रक्रिया उद्योगाचा अभ्यास केला. ‘अॅग्रो-एन्टरप्रेन्युअरशिप अँड बिझनेस मॅनेजमेंट’ या विषयाच्या अभ्यासक्रमांतर्गत या औद्योगिक अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी सह्याद्री फार्म्समधील जागतिक दर्जाची यंत्रणा, अत्याधुनिक पॅक हाऊस, कोल्ड चेन मॅनेजमेंट आणि फळ प्रक्रिया युनिट्सची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकरी उत्पादक कंपनीच्या (FPC) माध्यमातून शेतकरी ते ग्राहक अशी साखळी कशी निर्माण केली जाते आणि निर्यातीसाठी कोणती मानके पाळली जातात, याचे तांत्रिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले.
या अभ्यास भेटीचे यशस्वी नियोजन प्रा. ए. के. डेरले यांनी केले. त्यांना प्रा. एस. जे. कडलग, प्रा. वाय. एल. भागुरे पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
या भेटीमुळे कृषी पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यातील उद्योजकतेच्या संधी आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाची सखोल माहिती मिळाल्याचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांनी यावेळी नमूद केले.
म. वि. प्र. कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सह्याद्री फार्म्सला अभ्यास भेट






