केडीएसपी कृषि महाविद्यालय, चाचडगांव, नाशिक आयोजित वृक्षवल्ली:२०२६ वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक समारंभ उत्साहात पार पडला. वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमात विविध नृत्य, नाटिका, एकपात्री नाटक, संगीत तसेच इतर विविध प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावी ह्या हेतूने दरवर्षी कृषि महाविद्यालयात वृक्षवल्ली चे आयोजन केले जाते.
वार्षिक स्नेहसंमेलन “वृक्षवल्ली: २०२६”





















