Landline: (0253)2577536 Mobile: +91-9403929617 acn_13@rediffmail.com
mvps mcaer_logo

Maratha Vidya Prasark Samaj's

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture

A/P - Chachadgaon (Nashik - Peth Highway), Tal - Dindori, Nashik-422203

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri )

mpkv mcaer_a

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)

              मराठा विद्या प्रसारक समाजाचे सर्वश्रूत  नाशिक शहर स्थित के टी एच एम   महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या ११ वीत शिकणाऱ्या ६० विध्यार्थी आणि विद्यार्थिनीची  मराठा विद्या प्रसारक समाज संचालित   आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ संलग्न कर्मयोगी  दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय चाचडगाव येथे अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात आले होते. हि भेट के टी एच एम महाविद्यालयाचे प्राध्यापक के आर रेडगावकर , डी एम कदम, ए एन अहिरे आणि श्रीमती एच एन भोसले  यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. या भेटी दरम्यान उपस्थित विध्यार्थ्यानी कृषि महाविद्यातल्यातील सर्व विभाग, विभागाच्या सर्व  सुस्सज प्रयोगशाळा, प्रशस्त अध्यापन कक्ष, प्लेसमेंट विभाग, स्पर्धा परीक्षा मंच कक्ष, सर्व अद्यावत पुस्तकांनी समृद्ध ग्रंथालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र आणि मुले आणि मुली यांसाठी असलेल्या सुस्सज वसतिगृहांना   भेट दिली. सर्व विभागातील विभाग प्रमुख आणि प्राध्यापकांनी विध्यार्थ्यांना त्या विषयातील   मिळणाऱ्या शेतीभिमुख  वैज्ञानिक अद्ययावत विविध संकल्पनाची ओळख करून दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी उत्सहाने  सहभाग घेऊन विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. तसेच विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी महाविद्यालयात सुरू असलेल्या प्रात्यक्षिक आधारित कार्यानुभवाधिष्ठित टिश्यू कल्चर मोड्युल, नर्सरी मॅनेजमेंट मोड्युल, मधुमक्षिका पालन मोड्युल, माती व पाणी परीक्षण मोड्युल, जिवाणू खत निर्मिती मोड्युल यांची प्रत्यक्ष पाहणे व निरीक्षण केले आणि पशुसंवर्धन  आणि दुग्धशात्र विभागातील प्रा कैलास भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली मोड्युल च्या विध्यार्थ्यानी तयार केलेल्या दर्जेदार लस्सी चा आस्वाद घेतला.

              महाविद्यालयातील प्रशस्त  अशा सेमिनार हॉल मध्ये  विद्यार्थ्यांना संबोधित करताना कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बापूसाहेब भाकरे यांनी   विध्यार्थ्यांना या  महाविद्यालयातून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात कार्यरत  यशस्वी  विद्यार्थ्यांची प्रेरणादायी माहिती  आणि  वर्तमानात आणि  भविष्यातील कृषि क्षेत्राचे महत्व विशद केले. तसेच प्रा. डॉ विशाल गमे यांनी कृषि महाविद्यालयात प्रवेशासाठी लागणाऱ्या निकष आणि पात्रतांची सविस्तर माहिती विध्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी आवर्जून विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील उपलब्ध करियर संधीचे मार्गदर्शन  करण्यासाठी कृषिभूषण श्री भूषण निकम यांचे माहितीपूर्ण सत्र ठेवण्यात आले होते. कृषी महाविद्यालयची अभ्यास भेट सर्व विध्यार्थ्यानी आणि प्राध्यापकांनी अत्यंत माहितीपूर्ण  आणि  प्रेरणादायी झाल्याचे संगितले.या प्रसंगी बोलताना  के टी एच एम   महाविद्यालयाचे प्राध्यापक रेडगावकर सर यांनी हे कृषि  महाविद्यालय निसर्गरम्य वातावरणात आणि सर्व सोयींनी सुस्सज असून उत्तम प्राविण्यपुर्ण  प्राध्यापकांद्वारे  परिपूर्ण असल्याचे नमूद केले. तसेच सदर अभ्यास भेट आयोजनाबद्दल प्राचार्यांचे आभार व्यक्त केले.  भेटीचे यशस्वीतेसाठी   मराठा विद्या प्रसारक समाजचे शिक्षणाधिकारी डॉ अजित मोरे आणि प्राचार्य डॉ बापूसाहेब भाकरे यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्रा. पंकजसिंह चौहाण यांनी संपूर्ण अभ्यास भेटीचे आयोजनात समन्वयकाची भूमिका पार पाडली . कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि आभार प्रदर्शन यांनी प्रा. डॉ. सुधीर शिंदे यानी केले.

के टी एच एम ११ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची कृषी महाविद्यालयास अभ्यास भेट

🌿Join the Future of Farming – Admissions Open 2025-26 🌿

Scroll to top