वार्षिक स्नेहसंमेलन वृक्षवल्ली २०२६ अंतर्गत महाविद्यालयातील विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणांना वाव मिळण्याच्या उद्देशाने महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानामध्ये मा. प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाविद्यालयाचे क्रीडा अधीकारी प्रा . कैलास भोईर आणि त्यांच्या टीम च्या समन्वयाने विविध खेळाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये प्रामुख्याने खो खो, कब्बडी, क्रिकेट, रस्सीखेच, हॉलीबॉल या मैदानी स्पर्धांसोबतच बुद्धीबळ, चित्रकला, वादविवाद, निबंध लेखन, रांगोळी आणि कॅर्रम यांसारख्या वैविध्यपूर्ण मनोरंजक स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांसोबतच महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर सदस्यांनी उत्सहाने सहभाग नोंदवला.
वृक्षवल्ली २०२६ अंतर्गत विविध खेळाच्या स्पर्धांचे आयोजन

















