Landline: (0253)2577536 Mobile: +91-9403929617 acn_13@rediffmail.com
mvps mcaer_logo

Maratha Vidya Prasark Samaj's

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture

A/P - Chachadgaon (Nashik - Peth Highway), Tal - Dindori, Nashik-422203

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri )

mpkv mcaer_a

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)

मविप्र कृषि महाविद्यालय चाचडगाव येथे बारावा आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन
महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी सलग्न मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय व कृषि तंत्रनिकेतन च्या वतीने चाचडगाव ता दिडोरी येथे बारावा आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. योग दिन मुलांच्या वसतीगृहातील खुल्या प्रांगणात पार पडला.
 योग दिवस कार्यक्रमानिमित्ताने हरी ओम योग व निसर्ग उपचार केंद्र, नाशिक यांच्यामार्फत योगसाधक श्री. दिलीप औटी व श्री. शैलेन्द्र कुलकर्णी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. योग दिनाचे औचित्य साधून आलेल्या पाहुण्यांनी उपस्थित असलेल्या प्राचार्य, प्राध्यापक तसेच विद्यार्थी आणी शिक्षकेतर कर्मचारी यांना योगासन करून घेऊन योगाचे महत्व समजावून सांगितले. कार्यक्रमाला कृषि  महाविद्यालयचे प्राचार्य,डॉ बापूसाहेब भाकरे सर, यांची प्रमुख उपस्थिती होती. योग दिवस म्हणजे एक दिवस योगा न करता त्याचा दैनंदिन जीवनात आत्मसाद केला पाहिजे असा संदेश आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना दिला. दररोज योगा केल्याने आपल्या शरीराला होणाऱ्या व्याधींपासून बचाव होतो व शरीर निरोगी राहण्यास मदत होते,असाही संदेश आजच्या कार्यक्रमातून मिळाला. मधुमेह, थायरॉईड यासारख्या व्याधींपासून मुक्तता मिळण्याचीही योगासने आजच्या कार्यक्रमात करून दाखवण्यात आली. कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांनीयोग ही आपली वैभवशाली संस्कृती व परंपरा आहे. याचे जतन करण्यासाठी हा योगदिन साजरा होत आहे. दैनंदिन योगाभ्यासाने आपण विना पैशाने मोफत सुदृढ आरोग्य प्राप्त करत असल्याने सर्वांनी नित्याने योगाभ्यास करावा. असे मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुधीर शिंदे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषि महाविद्यालयाचे प्रा. एस. यु. सुर्यवंशी, प्रा. एस. बी. सातपुते तसेच इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य मिळाले.
मविप्र कृषि महाविद्यालय चाचडगाव येथे बारावा आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन-2026

🌿Join the Future of Farming – Admissions Open 2025-26 🌿

Scroll to top